भजनी मालिका
← भजनांकडे परत

झालों आतां एके ठायीं । न वंचूं कांहीं एकमेकां

jhalon atan eke thayin | na vanchun kanhin ekamekan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झालों आतां एके ठायीं । न वंचूं कांहीं एकमेकां ॥१॥ सरलों हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ध्रु.॥ सोडोनियां गांठीं पाहें । काय आहे त्यांत तें ॥२॥ तुका म्हणे झालों निराळा । आतां गोपाळा देऊं बोभा ॥३॥