भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये

jhali jhadapani khadatar devata | sancharali atan nighon naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥१॥ मज उपचार झणी उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ध्रु.॥ नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी कांहीं आतां ॥२॥ तुका म्हणे कळों आलें वर्तमान । माझें तों वचन आच्छादलें ॥३॥