भजनी मालिका
← भजनांकडे परत

झालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या ह्मैसी

jhalen ramarajya kay unen amhansi | dharani dhari pik gai volalya hmaisi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या ह्मैसी ॥१॥ राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दिळतां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥ स्वप्नीं ही दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें कळीकाळा ॥२॥ तुका म्हणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥३॥