भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण

jhala kavatuk karitan rokaden | anik hi pudhen narayan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥१॥ येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं॥२॥ इंद्रा दहीं दुध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनि वाटे त्यांचें ॥३॥ हिरोनि घेतल्या कावडी सकळा । म्हणती गोपाळा बरें नव्हे ॥४॥ नव्हे तें चि करी न भे कळिकाळा । तुका म्हणे लीळा खेळे देव ॥५॥