भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाला जीवासी उदार । त्यासी काय भीडभार

jhala jivasi udar | tyasi kay bhidabhar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झाला जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥१॥ करीन आडक्या घोंगडें । उभें बाजारीं उघडें ॥ध्रु.॥ जों जों धरिली भीड । तों तों बहु केली चीड ॥२॥ तुका म्हणे मूळ । तुझें उच्चारीन कुळ ॥३॥