भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाडे वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां

jhade varaponi khauniyan pala | athavi viththala velovelan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झाडे वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां ॥१॥ वल्कलें नेसुनि ढुंगा गुंडाळुन । सांडी देहभान जवळुनी ॥ध्रु.॥ लोकमान वमनासमान मानणें । एकांतीं राहणें विठोसाठी ॥२॥ सहसा करूं नये प्रपंचीं सौजन्य । सेवावें अरण्य एकांतवास ॥३॥ ऐसा हा निर्धार करी जो मनाचा । तुका म्हणे त्याचा पांग फिटे ॥४॥