भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्ही

jenen tuj jalen rup ani nanv | patit hen daiv tujhen amhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्ही ॥१॥ नाहीं तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ध्रु.॥ अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणासी ॥२॥ धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावें तें ॥३॥ अमृतासी मोल विषाचिया गुणें । पितळें तरी सोनें उंच निंच ॥४॥ तुका म्हणे आम्ही असोनिया जान । तुज देव पणा आणियेलें ॥५॥