भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देई प्रेमसुख

jenen majhen chitta rahe tujhya payin | akhand ten dei premasukh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देई प्रेमसुख ॥१॥ देहभाव राख दीन करूनियां । जनाचारी वायां जाय तैसा ॥ध्रु.॥ द्रव्य दारा नको मानाची आवडी । कवणेविशीं गोडी प्रपंचाची ॥२॥ तुझें नाम माझें धरूनियां चित्त । एकांत लोकांत सदा राहो ॥३॥ तुका म्हणे तुझे जडोनियां पायीं । झालों उतराईं पांडुरंगा ॥४॥