भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरीं वरीं

jauniyan tirtha kay tuvan kelen | charma prakshalilen varin varin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरीं वरीं ॥१॥ अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥ वृंदावन फळ घोळलें साकरा । भीतरील थारा मोडे चि ना ॥२॥ तुका म्हणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कसाय फुंदा तुम्ही ॥३॥