भजनी मालिका
← भजनांकडे परत

जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये

jativijatichi vhavayasi bheti | sankalpa to potin vahon naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥१॥ होणार तें घडो होणाराच्या गुणें । होईल नारायणें निर्मीलें तें ॥ध्रु.॥ व्याघ्राचिये भुके वधावी ते गाय । याचें नांव काय पुण्य असे ॥२॥ तुका म्हणे न करी विचार पुरता । गरज्याची माता पिता खरे ॥३॥