भजनी मालिका
← भजनांकडे परत

जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि ज्ञान ब्रम्ह होय

jari ha ho krupa karil narayan | tari hen chi dnyan bramha hoy

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि ज्ञान ब्रम्ह होय ॥१॥ कोठोनियां कांहीं न लगे आणावें । न लगे कोठें जावें तरावया ॥ध्रु.॥ जरी देव कांहीं धरिल पैं चित्तीं । तरि हे चि होती दिव्य चक्षु ॥२॥ तुका म्हणे जरी देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाहीं ॥३॥