भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा

janma mrutyu phar jhale majhya jiva | aik majha dhanva panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥१॥ सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाईच्या वरा पावें वेगीं ॥२॥ तुका म्हणे तूं गा पतितपावन । घेई माझा शीण जन्मांतर ॥३॥