भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने

jane vartaman | pari ten na vare tyachyane

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥१॥ तो ही कारणांचा दास । देव म्हणवितां पावे नास ॥ध्रु.॥ वेची अनुष्ठान। सिद्धी कराया प्रसन्न ॥२॥ तुका म्हणे त्याचें । मुदल गेलें हाटवेचें ॥३॥