भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळों त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड

jalon tyachen tond | aisi kan te vyali rand

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जळों त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड ॥१॥ सदा भोवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ध्रु.॥ फोडिली गोंवरी। ऐसी दिसे तोंडावरी ॥२॥ तुका म्हणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥३॥