भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळो माझें कर्म वायां केली कटकट

jalo majhen karma vayan keli katakat

जळो माझें कर्म वायां केली कटकट । झालें तैसें तंट नाहीं आलें अनुभवा ॥१॥ आता पुढें धीर काय देऊं या मना । ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥ध्रु.॥ गुणवंत केलों दोष जाणायासाठीं । माझें माझें पोटीं बळकट दूषण ॥२॥ तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥३॥