भजनी मालिका
← भजनांकडे परत

जालें पीक आम्हां अवघा सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख

jalen pik amhan avagha sukal | gheun avagha kal premasukh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जालें पीक आम्हां अवघा सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख ॥१॥ जाली अराणुक अवघियांपासून । अवघा गेला सीण भाग आतां ॥ध्रु.॥ अवघा जाला आम्हां एक पांडुरंग । आतां नाहीं जग माझें तुझें ॥२॥ अवघे चि आह्मी ल्यालों अळंकार । शोभलों हि फार अवघ्यांवरी ॥३॥ तुका म्हणे आह्मी सदेवांचे दास । करणें न लगे आस आणिकांची ॥४॥