भजनी मालिका
← भजनांकडे परत

जग तरि आम्हां देव । परि हे निंदितों स्वभाव

jag tari amhan dev | pari he ninditon svabhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जग तरि आम्हां देव । परि हे निंदितों स्वभाव ॥१॥ येतो हिताचा कळवळा । पडती हातीं म्हणूनी काळा ॥ध्रु.॥ नाहीं कोणी सखा । आम्हां निपराघ पारिखा ॥२॥ उपक्रमें वदे । तुका वर्मासी तें भेदे ॥३॥