भजनी मालिका
← भजनांकडे परत

जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती

jag jogi jag jogi | jagajage bolati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती ॥१॥ जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ध्रु.॥ अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥२॥ पूजापात्र कांहीं । फल पुष्प तोय ॥३॥ बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥४॥ नका घेऊं भार । धर्म तोचि सार ॥५॥ तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥६॥