भजनी मालिका
← भजनांकडे परत

इच्छिलें ते शकुनवंती । होय देती तात्काळ

ichchhilen te shakunavanti | hoy deti tatkal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इच्छिलें ते शकुनवंती । होय देती तात्काळ ॥१॥ क्षीरा नीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥ध्रु.॥ भाग्याविण कैचें फळ ।अंतर मळमूत्राचें ॥२॥ तुका म्हणे संचित कुडें । तें बापुडें करीतसे ॥३॥