भजनी मालिका
← भजनांकडे परत

इच्छा चाड नाहीं । न धरी संकोच ही कांहीं

ichchha chad nahin | na dhari sankoch hi kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इच्छा चाड नाहीं । न धरी संकोच ही कांहीं ॥१॥ उदका नेले तिकडे जावे । केले तैसै सहज व्हावे ॥ध्रु.॥ मोहरी कांदा ऊंस । एक वाफा भिन्न रस ॥२॥ तुका म्हणे सुख । पीडा इच्छा पावे दुःख ॥३॥