भजनी मालिका
← भजनांकडे परत

हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके

humbarati gaye tayankade kan | kaivalyanidhan deuni thake

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥१॥ गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥ चोरोनियां खाये दुध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥२॥ निष्काम तो झाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥३॥ जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥४॥ तुका म्हणे हें चि चैतन्यें सावळें । व्यापुनि निराळें राहिलेंसे ॥५॥