भजनी मालिका
← भजनांकडे परत

होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची

houni sannyasi bhagavin lugadin | vasana na sodi vishayanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥१॥ निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥ध्रु.॥ तुका म्हणे ऐसें दांभिक भजन । तया जनार्दन भेटे केवीं ॥२॥