भजनी मालिका
← भजनांकडे परत

होईल कृपादान । तरी मी येईन धांवोन

hoil krupadan | tari mi yein dhanvon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होईल कृपादान । तरी मी येईन धांवोन ॥१॥ होती संतांचिया भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥ध्रु.॥ रिघेन मातेपुढें । स्तनपान करीन कोडें ॥२॥ तुका म्हणे ताप । हरती देखोनियां बाप ॥३॥