भजनी मालिका
← भजनांकडे परत

हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें

hitavari yaven | koni bolilon ya bhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥१॥ नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥ध्रु.॥ केली अटाअटी । अक्षरांची देवासाठी ॥२॥ तुका म्हणे खिजों । नका जागा येथें निजों ॥३॥