भजनी मालिका
← भजनांकडे परत

हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें

hit sange tenen dilen jivadan | ghataki to jan manamagen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥१॥ बळें हे वारावे आडरान करितां । अंधळें चालतां आडरानें ॥ध्रु.॥ द्रव्य देऊनियां धाडावें तीर्थासी । नेदावें चोरासी चंद्रबळ ॥२॥ तुका म्हणे ऐसें आहे हें पुराणीं । नाहीं माझी वाणी पदरींची ॥३॥