भजनी मालिका
← भजनांकडे परत

हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं

hira thevitan airanin | vanche maritan jo ghanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥१॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥ मोहरा होय तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥२॥ तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥३॥