भजनी मालिका
← भजनांकडे परत

हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी

hira shobhala kondanin | jadit manikanchi khani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥१॥ तैसा दिसे नारायण । मुख सुखाचे मंडण ॥ध्रु.॥ कोटि चंद्रलीळा । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥२॥ तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी ते न ये ॥३॥