भजनी मालिका
← भजनांकडे परत

हीन याती पतीत दुर्बळ

hin yati patit durbal

रचनाकार: संत बंका · अभंग
हीन याती पतीत दुर्बळ । परि तुम्ही दयाळ दिनानाथ ॥१॥ अनाथा कैवारी त्रिभुवनी ठसा । नामाचा भरंवसा त्रिभुवनीं ॥२॥ नाम घेतां कोणी न दिसे वायां गेला । ऐसाची गमला भावबळे ॥३॥ वंका म्हणे सर्वज्ञा विठोबा दयाळा । पुरवावा लळा हाची माझा ॥४॥