भजनी मालिका
← भजनांकडे परत

हीन माझी याति । वरी स्तुती केली संतीं

hin majhi yati | vari stuti keli santin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हीन माझी याति । वरी स्तुती केली संतीं ॥१॥ अंगीं वसूं पाहे गर्व । माझें हरावया सर्व ॥ध्रु.॥ मी एक जाणता । ऐसें वाटतसे चित्ता ॥२॥ राख राख गेलों वांयां । तुका म्हणे पंढरीराया ॥३॥