भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंदऱ्याचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें

hendaryachen bharitan kan | halavi man bhonk riten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हेंदऱ्याचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥१॥ नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥ अवगुणी बाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥२॥ तुका म्हणे फजितखोरा । म्हणतां बरा उगा रहा ॥३॥