भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें चि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो

hen chi jatan kara dan | dharuni charan rahilon to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें चि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो॥१॥ घ्यावी माझ्या हातें सेवा । हे चि देवा विनवणी ॥ध्रु.॥ आणीक कांहीं न घलीं भार । बहुत फार सांकडें ॥२॥ तुका तुमचा म्हणवी दास । त्याची आस पुरवावी ॥३॥