भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा

hen chi dan dega deva | tujha visar na vhava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥ न लगे मुक्ती आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥ तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावें आह्मासी ॥३॥