भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा

hen chi bhavarogachen aushadh | janma jara tute vyadh | anik kanhin navhe badh | karil vadh shadvarga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥१॥ सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥ भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान । तरीं च घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥२॥ नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥३॥ पास तें एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी । होईल गुसिळलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥४॥ न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा । होसिल मागें होतासि तैसा । तुका म्हणे दशा भोगीं वैराग्य ॥५॥