भजनी मालिका
← भजनांकडे परत

हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपै

he chi bheti sach rupacha athav | visavala jiv avadipai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपै ॥१॥ सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥ दुरील जवळी आपण चि होतें । कवळिलें चित्तें जिवापासीं ॥२॥ तुका म्हणे नाम घेतों वेळोवेळां । होतील सकळा शीतळा नाडी ॥३॥