भजनी मालिका
← भजनांकडे परत

हे चि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनियां गोपाळकाला सेवूं

he chi anuvad sada sarvakal | karuniyan gopalakala sevun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हे चि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनियां गोपाळकाला सेवूं ॥१॥ वोरसलें कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आइतें गगनभरी ॥ध्रु.॥ संत सनकादिक गोमट्या परवडी । विभाग आवडी इच्छेचिये ॥२॥ तुका म्हणे मधीं घालूं नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळें ॥३॥