भजनी मालिका
← भजनांकडे परत

हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते

hason ruson atan vadhavun avadi | antarinchi godi avit te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥ सेवासुखें करूं विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥ तुका म्हणे आम्ही झालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥