भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिविण दुजे नावडे पै दैवत

harivin duje navade pai daivat

रचनाकार: संत सोपान · अभंग
हरिविण दुजे नावडे पै दैवत । जी समर्थ बोले सृष्टि ।।१।। हरिराम गोविंद नित्य हाचि छंद । हृदया आनंद प्रेमबोधु ॥२॥ हरि हेचि दैवत समर्थ पै आमूचे । बोलणे वेदांचे बोलती मुनी ॥३॥ सोपान आलगटु नामपाठ वावे । नित्य विठ्ठलाचे चरण सवयी ॥४॥