भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीभक्ती माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे

haribhakti majhe jivalag soire | hrudayin paule dharin tyanche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीभक्ती माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥१॥ अंतकाळीं येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणें देइन त्यांसी ॥ध्रु.॥ आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवांचोनि नाहीं मज ॥२॥ देइन आलिंगण धरीन चरण । संवसारशीण नासे तेणें ॥३॥ कंठीं तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥४॥ तयांचे चरणीं घालीन मी मिठी । चाड ही वैकुंठीं नाहीं मज ॥५॥ आळसें दंभें भावें हरीचें नाम गाती । ते माझे सांगाती परलोकींचे ॥६॥ कायावाचामनें देइन क्षेम त्यासी । चाड जीवित्वासी नाहीं मज ॥७॥ हरीचें नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणी वरी ॥८॥ तुका म्हणे तया उपकारें बांधलों। म्हणऊनि आलों शरण संतां ॥९॥