भजनी मालिका
← भजनांकडे परत

हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट

halavuni khunt | adhin karava balakat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट ॥१॥ मग तयाच्या आधारें । करणें अवघें चि बरें ॥ध्रु.॥ सुख दुःख साहे । हर्षोमर्षी भंगा नये ॥२॥ तुका म्हणे जीवें । आधीं मरोनि राहावें ॥३॥