भजनी मालिका
← भजनांकडे परत

हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ

hagilyache sinke vonava chi rahe | apashakun pahe vedagal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥ अतेता समय नेणतां अवकळा । येऊं नये बाळा सिक धरा ॥ध्रु.॥ भोजनसमयीं ओकाचा आठव । ठकोनियां जीव कष्टी करी ॥२॥ तुका म्हणे किती सांगावे उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥३॥