भजनी मालिका
← भजनांकडे परत

हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे

hachi nem atan na phiren maghari | baisalen shejarin govindache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥ घररिघी झालें पट्टराणी बळें । वरीलें सांवळें परब्रम्ह ॥२॥ बळियाचा अंगसंग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥