भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुशिष्यगण । हें तों अधमलक्षण

gurushishyagan | hen ton adhamalakshan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गुरुशिष्यगण । हें तों अधमलक्षण ॥१॥ भूतीं नारायण खरा । आप तैसा चि दुसरा ॥ध्रु.॥ न कळतां दोरी साप। राहूं नेंदावा तो कांप ॥२॥ तुका म्हणे गुणदोषी । ऐसें न पडावें सोसीं ॥३॥