भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची

gopalan ubhadu navare duhkhacha | kuntit he vacha jhali tyanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची ॥१॥ झालें काय ऐसें न कळे कोणासी । म्हणती तुम्हांपासीं देव होता ॥२॥ देवासवें दुःख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥३॥ आजि दिसे हरी फांकला यांपाशीं । म्हणउनि ऐशी परि झाली ॥४॥ जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि । शाहाणे तयांसि कळों आले ॥५॥ कळों आलें तीहीं स्फुंद शांत केला । ठायींचा च त्यांला थोडा होता ॥६॥ होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥७॥ सांगे आतां हरी तुम्हां आम्हां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥८॥ यासी अवकाश नव्हे चि पुसतां । जालिया अनंता कोण परि ॥९॥ परि त्या दुःखाची काय सांगों आतां । तुका म्हणे माता लोकपाळ ॥१०॥