भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोकुळीं वैकुंठ वसे गोपाळांमाजी

gokulin vaikunth vase gopalammaji

गोकुळीं वैकुंठ वसे गोपाळांमाजी । सौरसें अभक्ता न दिसे काय करूं ॥१॥ पूर्वपुण्य चोखडें ब्रह्मांड कोडें । तो यशोदेकडे शोभे कैसा ॥२॥ वसुदेव आपण देवकीये समीप । वैकुंठीचें दीप लाडेंकोडें ॥३॥ उग्रसेन संप्रधार केला राज्यधर । यादव परिवार रामकृष्ण ॥४॥ द्वारकानाथ हरि सोळासहस्त्र नारी । बळिराम परिवार हरि माझा ॥५॥ निवृत्ति जीवन ध्यान एक रामकृष्ण । उच्चारणी कोटि यज्ञ होती नामें ॥६॥