भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची

god lage pari sangatan chi na ye | baise mithi saye avadichi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥१॥ वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मीमाजी अंगें हारपलीं ॥ध्रु.॥ परते चि ना दृष्टी बैसली ते ठायीं । विसावोनि पायीं ठेलें मन ॥२॥ तुकयाच्या स्वामीसवें झाली भेटी । तेव्हां झाली तुटी मागिलाची ॥३॥