भजनी मालिका
← भजनांकडे परत

घ्या रे लुटी प्रेम सुख । फेडा आजि धणी । चुकला तो मुकला । झाली वेरझारी हाणी

ghya re luti prem sukh | pheda aji dhani | chukala to mukala | jhali verajhari hani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घ्या रे लुटी प्रेम सुख । फेडा आजि धणी । चुकला तो मुकला । झाली वेरझारी हाणी ॥१॥ घाला घातला वैकुंठीं । करूनियां जीवें साटी । पुरविली पाठी । वैष्णवीं काळाची ॥ध्रु.॥ अवघें आणिलें अंबर । विठोसहित तेथें धुर । भेदूनि जिव्हार । नामबाणीं धरियेला ॥२॥ संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघीं झालीं गहन । केलीं पापपुण्यें । देशधडी बापुडीं ॥३॥ आनंदें गर्जती निर्भर । घोष करिती निरंतर । कांपती असुर । वीर कवणा नांगवती ॥४॥ जें दुर्लभ ब्रम्हादिकां । आजि सांपडलें फुका । घ्या रे म्हणे तुका । सावचित्त होउनी ॥५॥