भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरोघरीं बहु जाले कवि । नेणे प्रसादाची चवी

gharogharin bahu jale kavi | nene prasadachi chavi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घरोघरीं बहु जाले कवि । नेणे प्रसादाची चवी ॥१॥ लंडा भूषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥ध्रु.॥ काढावें आइतें । तें चि जोडावें स्वहितें ॥२॥ तुका म्हणे कळे । अहाच झांकतील डोळे ॥३॥