भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालुनियां मापीं । देवभक्ती बैसले जपीं

ghaluniyan mapin | devabhakti baisale japin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घालुनियां मापीं । देवभक्ती बैसले जपीं ॥१॥ तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुडी ॥ध्रु.॥ अमुपीं उखतें । आपण वोस आपण यातें ॥२॥ देव आतां जाला । उगवे संकोच वहिला॥३॥ अखंड नेलें वेठी । भार सत्याविण गांठी ॥४॥ आडकिला झोंपा । रिता कलेवरचा खोंपा ॥५॥ गोदातीरीं आड । करिते करविते द्वाड॥६॥ तुका म्हणे बळें । उपदेशाचें तोंड काळें ॥७॥