भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालूनियां मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती

ghaluniyan madhyavarti | datuni upadesh deti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घालूनियां मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती ॥१॥ ऐसे पोटभरे संत । तयां कैंचा भगवंत ॥ध्रु.॥ रांडापोरांतें गोविती । वर्षासन ते लाविती ॥२॥ जसे बोलती निरोपणीं । तैसी न करिती करणी ॥३॥ तुका म्हणे तया । तमोगुणियाची क्रिया ॥४॥