भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालीं भार देवा । न लगे देश डोई घ्यावा

ghalin bhar deva | na lage desh doi ghyava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घालीं भार देवा । न लगे देश डोई घ्यावा ॥१॥ देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥ व्यवसाय निमित्त। फळ देतसे संचित ॥२॥ तुका म्हणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥३॥